flavored tobacco राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखूचा बाजार चंद्रपूर जिल्ह्यात मागील अनेक वर्षांपासून जोमात सुरू आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात वसीम, जयसुख आणि गुप्ता हे हा अवैध व्यवसाय मुजोरीने करीत आहे, विशेष म्हणजे या तिघांवर अनेकदा गुन्हे दाखल झाले मात्र प्रतिबंधित कारवाई न झाल्याने नागरिकांना कॅन्सर सारखा आजार देणाऱ्या या तिघांनी संघटित गुन्हेगारी चालवली आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखा अवैध व्यवसायाविरुद्ध धडक मोहीम राबवली आहे.
5 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 1 लाखांच्या सुगंधित तंबाखू सहित महिलेसह एकाला अटक केली आहे.
चंद्रपुरात दोन अट्टल गुन्हेगारांची खुनी फाईट
रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्तीवर असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की रयतवारी कॉलरी येथे सुगंधित तंबाखू चा माल येणार आहे.
माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्ता किराणा दुकानाच्या मागील बाजूस असलेले गोदाम जवळ चारचाकी वाहनांच्या खाली असलेल्या सुगंधित तंबाखूच्या चुंगडया दुसऱ्या वाहनात भरत असताना अमरजीत ध्रुवप्रसाद गुप्ता व दुर्गापूर येथील रक्षा ठक्कर यांना अटक करण्यात आली.
यावेळी स्थानिक गुन्हे शाखेने 1 लाख 450 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला, आरोपी महिला रक्षा ठक्कर व अमर जित गुप्ता यांच्या रामनगर पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 प्रमाणे गुन्हा दाखल करीत तपासात घेतला.
सदरची यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी सतीश अवथरे, संतोष एलपूलवार, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे यांनी केली.