Desi katta आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर पोलिसांनी अवैध धंद्यावर कारवाईची धडक मोहीम राबवली आहे, या मोहिमेत शहर पोलीस सतत कारवाई करीत असून 4 नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करताना शहर पोलिसांनी 32 वर्षीय इसमाजवळून देशी कट्टा जप्त केला. सदर कट्टा विकण्याकरिता आरोपी इसम आला होता.
Desi katta गुन्हे शोध पथक आज पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की लालपेठ रेल्वे स्टेशन परिसरात एक इसम देशी कट्टा विक्री करण्यासाठी फिरत आहे, माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा रचत 32 वर्षीय भारत उर्फ मायकल मल्लया गुंपाला राहणार लालपेठ याला अटक केली.
बनावट स्क्रीनशॉट, कॅश ऑन डिलिव्हरी नवी फसवणूक
आरोपी मायकल कडून एक जिवंत काडतुस व कट्टा असा एकूण 12 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. Desi katta
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी चौगुले, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि निलेश वाघमारे, पोउपनी संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी महेंद्र, सचिन, संतोष कुमार, भावना, कपूरचंद, रुपेश पराते, इर्शाद, शाबाज, विक्रम, खुशाल, रुपेश, इम्रान, राहुल व दिलीप यांनी केली.