City Police : सावधान सोनं खरेदी करतायं, ही बातमी वाचा

City Police : सावधान सोनं खरेदी करतायं, ही बातमी वाचा

 City police दिवाळीच्या धामधुमीत सराफा बाजारात सोनं घेण्यासाठी महिलांनी एकचं गर्दी केली होती, मात्र त्या सोन्यावर दुसऱ्या कुणाची तरी नजर बसली आणि सोनं लुटणाऱ्या महिलांनी काम फत्ते करीत संधीचे सोनं केलं.

City police


City police 30 ऑक्टोबर रोजी शहरातील विप्लव ज्वेलर्स मधून 34 वर्षीय शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या निता श्रीकृष्ण आवारी यांनी आई व मोठ्या बहिणीसोबत 28 हजार 875 रुपयांचे सोन्याचे टॉप्स खरेदी केले, मात्र त्यांनी घेतलेल्या सोन्यावर कुणाची तरी नजर होती याबाबत आवारी ह्या नकळत होत्या.

सोन्याचे टॉप्स घेतल्यावर आई व बहिणीसोबत ऑटोने घरी निघाल्या मात्र त्याक्षणी 2 अज्ञात महिला सुद्धा त्या ऑटो मध्ये बसल्या व पाण्याची टॉकी जवळ नागपूर रोड येथे उतरले, त्यानंतर निता आवारी यांनी बॅग मध्ये ठेवलेले सोन्याचे टॉप्स तपासून बघितले असता त्यामध्ये ते आढळून आले नाही, 3 नोव्हेंबर रोजी निता आवारी यांनी घडलेला सदर प्रकार चंद्रपूर शहर पोलिसांसमोर कथन केला. नीता यांनी त्या 2 महिलांवर संशय व्यक्त केला. City police

पोलिसांनी कलम 303 अंतर्गत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासून बघितले व मुखबिर ने याबाबत पुढील माहिती पोलिसांना दिली, माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने 55 वर्षीय सुशीला प्रकाश शेट्टी व 28 वर्षीय वासंती उर्फ सोनू व्यंकटेश शेट्टी राहणार एलबी नगर बँक कॉलोनी हैद्राबाद यांना अटक केली.

दोन्ही महिला आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांच्या जवळून सोनं व चांदीचे दागिने रोख 1 लाख 33 हजार रुपये आढळून आले, पोलिसांनी एकूण 5 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात व्यंकटेश शेट्टी हा आरोपी पसार असून पोलीस त्याच्या शोधात आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनि निलेश वाघमारे, पोउपनी संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, संतोष कावळे, शाहबाज सय्यद, विक्रम मेश्राम, राजेश चिताडे व महिला पोलीस भावना रामटेके यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने