Cash on delivery scams : आजच्या आधुनिक जगात नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत आहे, मात्र या तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत आहे, ऑनलाइन क्रांती मुळे देशात नव्या पर्वाला सुरुवात झाली मात्र आता हे ऑनलाइन पर्वात धोके जास्त असल्याने नागरिक याचा काही प्रमाणात जपून वापर करीत आहे.
कॅश ऑन डिलिव्हरी च्या नावाखाली चंद्रपुरात एका युवकाने नवी युक्ती वापरत डिलिव्हरी बॉय ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Cash on delivery scams
शहरातील ई कार्ट कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा चेतन सोनवणे या युवकाने फ्लिपकार्ट कंपनीकडून एका कस्टमरला मोबाईल डिलिव्हर करायचा होता, त्या मोबाईलच्या पॅकिंग मध्ये दिल्या गेलेल्या मोबाईल क्रमांकावर चेतन ने कॉल करीत एकोरी वार्ड येथे कस्टमरने सदर मोबाईलची डिलिव्हरी घेतली मात्र मोबाईल पेमेंट म्हणून कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय असल्याने कस्टमरने चेतन ला ऑनलाइन पेमेंट केला असा स्क्रीनशॉट पाठविला.
2 ते 3 तास झाल्यावर सुद्धा मोबाईल चे 24 हजार 116 रुपये कंपनीच्या खात्यात जमा झाले नसल्याने चेतन ने कस्टमरला कॉल केला असता त्याने पुन्हा पेमेंट केल्याचा स्क्रीनशॉट पाठविला, मात्र पेमेंट कंपनीच्या खात्यात जमा झाला नाही त्यामुळे कस्टमर साद शेख याने आपली फसवणूक केली असल्याची खात्री पटल्यावर चेतन ने चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीची तक्रार दिली. Cash on delivery scams
अवश्य वाचा : चंद्रपुरात सोनं लुटणारी महिलांची टोळी सक्रिय
सदर घटना ही 31 ऑगस्ट 2024 रोजी घडली, कस्टमर साद शेख याने चेतन ला पेमेंट चा फेक स्क्रीनशॉट पाठविला अशी खात्री पोलिसांच्या तपासात झाली.
पोलिसांनी आरोपी साद शेख वर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला व पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी सदर प्रकरण तांत्रिक दृष्ट्या क्लिष्ट स्वरूपाचे असल्याने याचा तपास चंद्रपूर शहर सायबर विभागाचे इम्रान शेख व सचिन राठोड यांच्याकडे देण्यात आला.
सायबर विभागाने आरोपी साद शेख यांची संपूर्ण माहिती काढली असता तो अहेरी तालुका जिल्हा गडचिरोली येथील असल्याचे स्पष्ट झाले, शहर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे यांनी अहेरी गाठून सापळा रचला व आरोपी साद शेख ला अटक केली. Cash on delivery scams
आरोपी साद शेख हा उच्चशिक्षित तरुण आहे, त्याने टेक्निकल विभागातून बीसीए चे शिक्षण घेतले आहे, मात्र त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग गुन्हेगारी क्षेत्रासाठी केला, वर्षभरापूर्वी साद ने चंद्रपूर शहरातील एका मोबाईल शॉप मध्ये 18 हजार रुपयांचा पेमेंट चा फेक स्क्रीनशॉट पाठवीत फसवणूक केली होती.
काही दिवसांपूर्वी शहरातील नामांकित ज्वेलर्स मधून 57 हजार रुपयांचा फेक स्क्रीनशॉट पाठवीत त्यांची सुद्धा आर्थिक फसवणूक केली असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने अजून किती नागरिकांसोबत अशी फसवणूक केली आहे याबाबत पोलीस पुढील तपास करीत आहे, याबाबत शहर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले की कोणताही व्यक्ती आपल्या दुकानात काही वस्तू खरेदी करून त्याचे पेमेंट ऑनलाइन करीत असेल तर जोपर्यंत पैसे खात्यात येत नाही तोपर्यंत आपण त्यावर विश्वास ठेवू नये, शक्य असल्यास सदर व्यक्तीचा मोबाईल क्रमांक व कार्ड डिटेल्स आणि आधार क्रमांक घ्यावा जेणेकरून फसवणूक झाल्यास त्याचा शोध घेण्यास सहकार्य होईल.