Attempt to murder चंद्रपूर - रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार, मिळून गुन्हेगारी क्षेत्रात दोघांनी पोलीस रेकॉर्ड वर आपले नाव चढविले मात्र काही पैश्यासाठी दोघांमध्ये वाद झाला आणि आपसात खुनी हल्ला केला.
Attaemp to murder 5 नोव्हेंबर रोजी शहरातील बागला चौकात एक इसम रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली, माहिती मिळताच शहर पोलीस बागला चौकात दाखल झाली, जखमी इसमाला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता त्याने सांगितले की माझ्या मित्राने काही पैश्यासाठी माझ्यावर सर्जिकल ब्लेड ने वार करीत खून करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये मी आपला जीव वाचवून पळालो.
चंद्रपुरातील मायकल जवळ बंदूक, पोलिसांनी केली अटक
पोलिसांनी जखमींचे बयान नोंदवीत अवघ्या तास भरात आरोपीला अटक केली.
28 वर्षीय संदीप मनोहर चौधरी राहणार महावीर नगर असे जखमीचे नाव असून 30 वर्षीय आकाश उर्फ चिरा अरविंद देशभ्रतार रा.दुर्गापूर असे आरोपीचे नाव आहे.
संदीप व आकाश हे दोघेही गुन्हेगारी क्षेत्रातील अट्टल गुन्हेगार, 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान महाकाली मंदिर परिसरात दोघे सोबत होते, मात्र अचानक काही पैश्यावरून दोघांमध्ये वाद झाला, काही वेळाने बाचाबाचीचे मारहाणीत रूपांतर झाले.
आकाश ने मागे पुढे न बघता आपल्या जवळील सर्जिकल ब्लेड ने संदीप च्या गळ्यावर वार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, रक्तबंबाळ अवस्थेत संदीप पळाला आणि बागला चौकात पोहचल्यावर तो रस्त्याच्या कडेला पडला.
जखमीचे मामा मनोज रामजी फुलझेले यांनी याबाबत शहर पोलिसांना माहिती दिली, पोलीस त्याठिकाणी तात्काळ दाखल झाले, रुग्णवाहिकेची वाट न बघता पोलिसांनी तात्काळ जखमीला रुग्णालयात दाखल केले असता त्याने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. जखमी संदीप चे मामा फुलझेले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम 109 अनव्ये आकाश वर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी शोध मोहीम राबवित अवघ्या तास भरात गौतम नगर परिसरातील झोपडपट्टी येथे लपलेल्या आकाश देशभ्रतार ला अटक केली. आरोपी जवळून गुन्ह्यात वापरलेला सर्जिकल ब्लेड जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमंक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके यांचे नेतृत्वत स.पो.नी. निलेश वाघमारे, पोउपनी. संदीप बच्छीरे, सफौ. महेंद्र बेसरकर , पोहवा सचीन बोरकर, संतोष कनकम, मपोहवा भावना रामटेके, नापोका कपुरचंद, पोका ईम्रान खान, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, राजेश चिताडे , ईर्शाद खान, रूपेश रणदिवे , शाहबाज अली, खुशाल कवले, विक्रम मेश्राम यांनी केली आहे.
गुन्हयाचा पुढील तपास पोउपनी महेश इटकल पोस्टे चंद्रपुर शहर हे करीत आहे.