Wagh nakh चंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेमार्फत अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उभारण्याचे काम सुरू आहे, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक नेमत अवैध धंद्याची माहिती काढत कारवाई करीत आहे.
Wagh nakh स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही इसम वाघाच्या नखाची विक्री करण्याकरिता चंद्रपुर शहरातील गिरीराज हॉटेल समोर येणार अशी माहिती मिळाली.
माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचत वाघनखे विकण्याकरिता 2 इसम आले असता दोघांना मोठ्या शिताफीने अटक केली, पोलिसांनी दोघांकडून 2 वाघनखे जप्त केली.
महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर स्थानिक गुन्हे शाखेने पकडली अवैध दारू
Wagh nakh 51 वर्षीय नंदकिशोर साहेबराव पिंपळे, धंदा मजुरी राहणार सिव्हिल लाईन चंद्रपूर व 65 वर्षीय रवींद्र शिवचंद्र बोरकर राहणार नगीनाबाग असे आरोपिताचे नाव आहे. दोन्ही आरोपीवर पुढील कारवाईकरिता सहायक वनसंरक्षक वनविभाग चंद्रपूर यांच्या ताब्यात देण्यात आले. सदर वाघनखे कुठून आली? ती कुणाला विकणार होते? याबाबत वनविभाग पुढील तपास करीत आहे.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी स्वामीदास चालेकर, नितीन कुरेकार, दिनेश अराडे व प्रशांत नागोसे यांनी केली.