Lcb chandrapur : सुगंधित तंबाखू तस्कराला गुन्हे शाखेचा दणका

Lcb chandrapur : सुगंधित तंबाखू तस्कराला गुन्हे शाखेचा दणका

 Lcb chandrapur वर्ष 2012 पासून राज्यात सुगंधित तंबाखू वर प्रतिबंध लावण्यात आला, मात्र आजपावेतो सुगंधित तंबाखू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे, चंद्रपूर जिल्ह्यात या तस्करीवर आळा घालावा यासाठी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले.

Lcb chandrapur


Lcb chandrapur पोलीस अधीक्षकांच्या आदेशावर स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार करीत कारवाई सुरू केली, 8 ऑक्टोबर ला स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापामार कारवाई करीत 7 लाख 58 हजार 96 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला.

दत्त नगर नागपूर रोड येथील पान मटेरियल विक्रेता 50 वर्षीय प्रेमकुमार बाबुराव बेले यांच्या पान मटेरियल च्या दुकानावर व घरी धाड मारली, या धाडीत तब्बल साडे सात लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यातील 9 जणांवर हद्दपारीची कारवाई

मुद्देमाल जप्त करीत आरोपीवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोउपनी संयोश निंभोरकर, कर्मचारी जयंत चुनारकर, नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, किशोर वाकटे, अमोल सावे, प्रफुल गारघाटे व दिनेश अराडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने