Chandrapur gambling : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या मागे झुडपात सुरू होता हा खेळ

Chandrapur gambling : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या मागे झुडपात सुरू होता हा खेळ

 Chandrapur gambling: अष्टभुजा येथील नवनिर्माणाधिन चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे बांधकाम अद्याप काही प्रमाणात पूर्ण व्हायचे असले तरी त्या परिसरात अवैध हालचाली करणारे काहीजण त्याचा फायदा घेत आहे.

Chandrapur gambling


Chandrapur gambling जिल्ह्यात आचारसंहिता लागल्यावर पोलीस विभागाने अवैध हालचालीवर लक्ष ठेवत कारवाई सत्र सुरू केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने 18 ऑक्टोबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागे सुरू असलेल्या जुगारावर धाड मारीत 7 जणांना अटक केली.

रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती, माहितीच्या आधारे मेडिकल कॉलेज च्या मागील भागातील झुडपात काही जण 52 ताश पत्त्यावर पैश्याची बाजी लावत होते. Chandrapur gambling

स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारत जुगार साहित्य असा एकूण 29 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत 7 जुगार बहाद्दर यांना अटक केली.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोउपनी विनोद भुरले, मधुकर सामलवार, पोलीस कर्मचारी किशोर वैरागडे, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, संतोष एलपूलवार, गोपाल आतकुलवार, गोपीनाथ नरोटे, मिलिंद टेकाम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने