Chandrapur city police : चंद्रपूर शहर पोलिसांचे कारवाई सत्र

Chandrapur city police : चंद्रपूर शहर पोलिसांचे कारवाई सत्र

 Chandrapur city police राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर चंद्रपूर शहर पोलिसांनी अवैध धंदे करणाऱ्या विरोधात कारवाईचे दंड थोपटले असून 12 दिवसात पोलिसांनी मोठ्या कारवाया केल्या आहेत.

Chandrapur city police


Chandrapur city police शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले गुन्हेगार व गुन्हेगारीला आळा घालणेकरिता शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने विशेष मोहीम राबविली.

15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर या कालावधीत पोलिसांच्या कारवाई सत्रात 5 तलवार, 1 चाकू जप्त करण्यात आले सोबतच गांजा सदृश्य वनस्पती जप्त केले, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानव्ये एकूण 62 केसेस करण्यात आल्या. यामध्ये वाहनसहित एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी महेंद्र बेसरकर, कपूरचंद खरवार, रुपेश पराते, संतोष कावळे, शाहबाज सय्यद, विक्रम मेश्राम व महिला पोलीस कर्मचारी भावना रामटेके यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने