Uncontrolled crime : थांब तुला हिसका दाखवितो?

Uncontrolled crime : थांब तुला हिसका दाखवितो?

 Uncontrolled crime (गुरू गुरनुले)मुल - राज्यात सध्या गुन्हेगारीने आतंक वाढविले असून गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत आहे, विजयादशमीला रात्री माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली, राज्यात सध्या सिद्दीकी हत्याकांड प्रकरणात धरपकड सुरू आहे, असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात 13 ऑक्टोबर रोजी घडला.

Uncontrolled crime


नात्यातील वाद इतका वाढला की महिलेने आपल्या भावंडांना बोलावीत शहर रक्तरंजित केले, याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व मूल पोलिसांनी आरोपीना अटक केली असून आरोपी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहे. Uncontrolled crime

 

दुचाकी बाजुला करून हातगाडी ठेला घेवुन जाण्याचे शुल्लक कारणावरून झालेल्या वादात एका १६ वर्षीय बालकाचा खून झाल्याची घटना मूल येथिल पंचशील वार्ड क्रमांक ७ मध्ये घडली. मृतकाचे नाव प्रेम चरण कामडे( १६)असुन यातील सात आरोपींना पोलिसांनी अटक केली असुन कलम १८९(२), १९१(२), १९१(३),१९०, १०९,६१(२) भा. द. वि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. यात तर स्वप्नील सुभाष देशमुख ,अविनाश चंद्रभान कामडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. Uncontrolled crime

मूल नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचशील वार्ड क्रमांक ७ मध्ये घराजवळ कामडे चुलत भाऊ असलेले कुंटुब राहतात. घटनेच्या वेळी आरोपी नामे नरेन्द्र नामदेवराव कामडे त्याची पत्नी मनीषा नरेन्द्र कामडे असे मिळुन त्याचा चुलत भाऊ चरण कामडे यांचे सोबत दुचाकी बाजुला करून हातगाडी ठेला घेवुन जाण्याचे शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यावेळी मनीषा नरेंद्र कामडे हीने चंद्रपूर येथे राहणाऱ्या भावाला फोन करून बोलावून घेतले. त्या व्यक्तीकडे धारधार चाकू असल्याने कुठलाही विचार न करता बबन कामडे यांचेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असताना त्याचा मुलगा प्रेम हा वडिलांना सोडविण्यासाठी समोर आला असता त्यात तो गंभीर जखमी झाला व पोटातील आतडी बाहेर आल्याने काही वेळातच त्याचा मृत्यु झाला.

सदर गुन्हयाचा बारकाईने तपास करून सदर गुन्हयातील आरोपीचा छळा लावुन शोथ घेवुन आरोपी  राजेश बंडु खनके  (२६) वर्ष रा. पठाणपुरा चंद्रपुर  सचिन बंडु खनके  (२७) रा. पठाणपुरा चंद्रपुर, वैभव राजेश महागावकर ( २३) वर्ष पठाणपुरा चंद्रपुर , कपील विजय गेडाम  (२३ )वर्ष, रा. पठाणपुरा चंद्रपुर , श्रीकांत नारायण खनके  (२८ )वर्ष रा. पठाणपुरा चंद्रपुर , नरेन्द्र उर्फ नरेश नामदेव कामडे (४२) वर्ष, रा.मूल यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली. सदर गुन्हयातील महिला आरोपी मनिषा नरेन्द्र कामडे वय( २९ )वर्ष रा.मुल हिला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली वॅगनार चारचाकी वाहन क्र. एम.एच.३४ ए.ए.४४२४ हि जप्त करण्यात असुन सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांचे मार्गदर्शनात सपोनि अमितकुमार आत्राम करीत आहेत. 

मूल बंद दरम्यान सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. व घटनेचा निषेध करण्यात आला. माञ बंद दरम्यान कुठलीही अनुचीत घटना घडली नाही.

आरोपी यांचे सराईत गुन्हेगार यांच्याशी चांगले संबंध आहे, त्यांनी सदर गुन्हा करताना घरून धारधार शस्त्र घेऊन प्रेम च्या कुटुंबियांना संपविण्यासाठी गेले मात्र प्रेम मध्ये आला आणि त्याचा हल्ल्यात नाहक बळी गेला.

चंद्रपुरात गुन्हेगारी वृत्ती पोलिसांवर हावी होताना दिसत आहे, अनेक गंभीर गुन्हे घडत असताना पोलिसांना आरोपी बाबत घटना घडण्यापूर्वी काही थांगपत्ता लागत नाही हे न समजण्यासारखे आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने