Pushpa style smuggling पुष्पा चित्रपटात लाल चंदनाची तस्करी वाहनातील एक भाग काढून केल्या जाते असे दाखविण्यात आले होते, आता तीच युक्ती चंद्रपुरात दारू तस्करीसाठी केल्याची बाब उघडकीस आली आहे.
Pushpa style smuggling 23 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने अश्याच एका मालवाहू वाहनात 88 हजाराची देशी व विदेशी दारू पकडली. रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना चारचाकी वाहन नागपूर वरून चंद्रपूर शहराच्या दिशेने येताना दिसले असता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनाला थांबवित त्याची झडती घेतली.
वाहनाच्या डाल्यामधे कप्पा तयार करून त्यामधे लपून देशी दारूच्या प्रत्येकी 90 ml 2000 नीपां किंमत 70000/- रू. व विदेशीं दारू 180Ml 96 निपा किंमत 18280/- रू. चां तसेच टाटा zenon मालवाहू गाडी किंमत 5,00,000/- रू. माल असा एकूण 5,88,240/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला. Pushpa style smuggling
आरोपी विरुध्द पो.स्टे. रामनगर येथे अपराध क्रमांक /2024 कलम 65 अ (ई ),83 म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई परी. Dysp प्रमोद चौगुले, पो नि कोंडावार,सपोनी दीपक कांक्रेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पो हवा. नितेश महात्मे, चेतन गज्जलवार, पोआ किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल गारघटे , प्रमोद कोटणाके, प्रसाद गुलदांदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली.