Prohibited flavored tobacco : बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडला सुगंधित तंबाखूचा साठा

Prohibited flavored tobacco : बल्लारपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेने पकडला सुगंधित तंबाखूचा साठा

 Prohibited flavored tobacco वर्ष 2012 पासून राज्यात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तस्करी सध्या अनेक जिल्ह्यात जोमाने सुरू आहे, चंद्रपूर जिल्ह्यात वसीम व जयसुख सारखे तस्कर या प्रतिबंधित तंबाखूची तस्करी करीत आहे. मात्र स्थानिक गुन्हे शाखा या तस्करीला थांबविण्यासाठी मोहीम राबवित आहे.

Prohibited flavored tobacco


Prohibited flavored tobacco बल्लारपूर शहरात स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या चमूने अवैध सुगंधित तंबाखू विक्रेत्यांवर छापा मारला असता त्याठिकाणी 53 हजार 819 रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला.

अवश्य वाचा : मूल शहरात अल्पवयीन मुलाची हत्या, भाजप कार्यकर्त्याला अटक


स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आंबेडकर वार्ड येथील नीरज शाहू हा भाड्याने रूम घेऊन त्याठिकाणी अवैध सुगंधित तंबाखूचा साठा बाळगत विक्री करीत आहे. Prohibited flavored tobacco

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेने त्याठिकाणी धाड मारली, सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त करीत आरोपी नीरज शाहू वर पो.स्टे. बल्लारपूर येथे अपराध क्रमांक  962 /2024 कलम 223, 275, 123 भा.न्या.सं. 2023 सहकलम 30 (2) 26 (2) (पअ), 59 अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तंबाखू तस्कर वसीम झिमरी वर मूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून लवकरचं तो पोलिसांच्या अटकेत असणार.

 सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. दीपक काँक्रेडवार, पोउपनि विनोद भुरले,पो हवा. किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावर, सतीश अवतरे  सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने