Latest chandrapur murder : पत्नीचा गळा आवळला आणि

Latest chandrapur murder : पत्नीचा गळा आवळला आणि

 Latest chandrapur murder घुग्घुस : घरगुती वादातून पत्नीची ओढणीने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घुग्घुस येथे सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. नाझिमा कलीम शेख (वय ३३, रा. घुग्घुस) असे मृत पत्नीचे नाव आहे. हत्या केल्यानंतर पती शेख कलीम शेख इब्राहिम (४२, रा. म्हातारदेवी रोड चिंतामणी कॉलेजजवळ, घुग्घुस) याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

Latest chandrapur murder


कलीम इब्राहिम शेख हा म्हातारदेवी मार्गावरील मुकीन खान यांच्या बिल्डिंगमध्ये भाड्याने राहत होता. पती-पत्नीमध्ये दररोजच घरगुती कारणातून वाद होत होते. सोमवारीसुद्धा असाच वाद झाला. रागाच्या भरात कलीमने ओढणीने पत्नीचा गळा आवळला. त्याच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याने घुग्घुस पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती देत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. 


घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार श्याम सोनटक्के करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने