Illicit flavored tobacco : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Illicit flavored tobacco : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

 Illicit flavored tobacco चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने 18 ऑक्टोबर रोजी अवैध सुगंधित प्रतिबंधित तंबाखूची मोठी खेप पकडली असून यावर्षी स्थानिक गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई आहे.

Illicit flavored tobacco


Illicit flavored tobacco चंद्रपूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता काळात पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सीमेवर बंदोबस्त लावला असून त्या अनुषंगाने अवैध दारू वाहतूक, जुगार प्रतिबंध व प्रतिबंधित तंबाखूवर कारवाई करण्याचे काम सुरू आहे.

18 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व सावली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची खेप येणार होती, त्याबाबत पोलिसांनी सावली येथील आंतरजिल्हा सीमेवरील व्याहाड खुर्द एसएसटी चेक पोस्टवर पांढऱ्या रंगाचा आयसर क्रमांक सीजी 07 CQ 4602 आला असता त्याला थांबविण्यात आले, सदर वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी तारेच्या बंडल खाली प्रतिबंधित सुगंधित तंबाखू मजा 108 हुक्का शिशा तंबाखूचे 200 ग्राम वजनाचे 1680 बॉक्स, 50 ग्राम वजनाचे 1800 बॉक्स किंमत 19 लाख 93 हजार 800 रुपये व जप्त वाहन असा एकूण 34 लाख 93 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. Illicit flavored tobacco

सदर कारवाईत पोलिसांनी वाहन चालक 27 वर्षीय इरफान कुरेशी मुस्तफा कुरेशी राहणार छत्तीसगड, 47 वर्षीय संतोष कुमार सुंदर सिंह वाहन चालक रा. मध्यप्रदेश यांच्याविरुद्ध अन्न सुरक्षा मानके अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सपोनि दीपक कांकेडवार, पोउपनी संतोष निंभोरकर, पोलीस कर्मचारी चेतन गज्जलवार, नितेश महात्मे, किशोर वाकाटे, अमोल सावे, प्रफुल्ल गारघाटे व प्रमोद डंबारे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने