Illegal Liquor Traffic : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडली अवैध दारू

Illegal Liquor Traffic : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने पकडली अवैध दारू

Illegal Liquor Traffic आदर्श आचारसंहिता लागू झाल्यावर बेकायदेशीर हालचाली मोठ्या प्रमाणात वाढतात, चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने सुगंधित तंबाखू सहित अवैध दारूवर मोठी कारवाई मोहीम जिल्ह्याच्या सीमेवर सुरू केली आहे, यामध्ये पोलिसांना चांगले यश मिळाले आहे.

Illegal Liquor Traffic


 Illegal Liquor Traffic  21 ऑक्टोबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांचे पथकाने नागपूर - चंद्रपूर मार्गावरील खांबाडा येथे नाकाबंदी केली त्यावेळी मारुती सुझुकी स्विफ्ट हे चारचाकी वाहन संशयास्पद रित्या येताना दिसले असता पोलिसांनी वाहनाला थांबवित झडती घेतली.

त्या वाहनामध्ये देशी दारू रॉकेट संत्राच्या 21 पेटी एकूण 2100 नग 90ml मिळुन आल्या. दारूची किंमत 73,500/- ₹ व मारुती सुझुकी स्विफ्ट वाहन 5,00,000/-₹ असा एकूण 5,73,500/-रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला. Illegal Liquor Traffic

गुन्हेगारी : झुडपात सुरू होता हा खेळ, 7 जणांना केली अटक

        चार आरोपीतां विरुध्द पो.स्टे. वरोरा येथे अपराध क्रमांक   727/2024 कलम 65 (अ)(ई), 82, 83 म.दा.का.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त मुद्देमाल व सर्व आरोपीतांना पुढील तपासकामी पो. स्टे. वरोरा चे ताब्यात देण्यात आले.

सदरची यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोनि महेश कोंडावर,पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ धनराज करकाडे, स्वामीदास चालेकर,पो हवा. नितीन कुरेकार , अजय बागेसर, पोशि गणेश भोयर, प्रशांत नागोसे, शशांक बदामवार सर्व स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने