Chandrapur police : चंद्रपूर जिल्ह्यातील 9 जणांना पोलिसांनी जिल्ह्यातून केले हद्दपार

Chandrapur police : चंद्रपूर जिल्ह्यातील 9 जणांना पोलिसांनी जिल्ह्यातून केले हद्दपार

 Chandrapur police चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी चंद्रपूर पोलीस विविध पध्दतीने कार्य करीत असून आतापर्यंत अनेक गुन्हेगारांना स्थानबद्ध व हद्दपारीची कारवाई पोलिसांनी केली आहे.

Chandrapur police


Chandrapur police 4 ऑक्टोबर ला पोलिसांनी एकाच दिवशी तब्बल 9 सराईत गुन्हेगारांना चंद्रपूर जिल्ह्यातुन 2 वर्षाकरिता हद्दपार केले, यामध्ये टोळीयुद्ध करणारे 28 वर्षीय शिवा उर्फ शिवाजी वसंता गोनेवार, नकोडा, 26 वर्षीय क्रिष्णा मल्हारी पाईकराव घुग्गुस, 27 वर्षीय सोनल शंकर गोगुला घुग्गुस, 34 वर्षीय राजेश उर्फ राजन्ना नरसिंग कंकटवार घुग्गुस यांना 2 वर्षाकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

अवश्य वाचा : धावत्या स्कुल व्हॅन मध्ये बलात्कार

सोबतच बल्लारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार 25 वर्षीय अभिषेक प्रकाश गादरला श्रीराम वार्ड, 20 वर्षीय प्रेम पापा बहुरीया श्रीराम वार्ड, 21 वर्षीय रोहन रोशन बहुरीया श्रीराम वार्ड, 21 वर्षीय कौशिक शंकर डोंगरे काटा गेट, 19 वर्षीय अभिषेक नारायण नक्कावार सरदार पटेल वार्ड यांना कलम 55 महाराष्ट्र पोलीस कायदा अनव्ये 2 वर्षाकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. Chandrapur police

आगामी सण उत्सव व निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील टोळ्या व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर कारवाई सुरू आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शिवलाल भगत, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्के, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी मोलाची कामगिरी बजावीत केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने