Chandrapur murder : जुन्या वादातून काढला काटा

Chandrapur murder : जुन्या वादातून काढला काटा

 Chandrapur murder 2 महिन्यांपूर्वी झालेला वाद पुन्हा उफाळून आला आणि तिघांनी मिळून एकाची हत्या केली, सदर घटना चंद्रपूर शहरातील महाकाली वार्डात घडली.

Chandrapur murder


आर्यन वासुदेव आरेवार असे मृतकाचे नाव आहे, 2 महिन्यांपूर्वी आर्यन व अश्विन उर्फ बंटी राजेश सलमवार या दोघात वाद झाला, वादाचे रूपांतर हाणामारीत झाले, आर्यन ने अश्विन ला जखमी केले होते, याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली होती. Chandrapur murder

झालेली मारहाण अश्विन च्या मनात सलत होती त्याने आर्यन चा काटा काढण्याचे ठरविले, या कटात अश्विन ने मित्र जॉन व जसीम यांची साथ घेतली.

15 ऑक्टोबर रोजी आर्यन हा घराजवळ होता त्यावेळी अश्विन आपल्या मित्रांसोबत आला आणि त्याच्याशी वाद घालू लागला, आणि धारदार शस्त्राने आर्यन वर तिघांनी वार करीत मारहाण केली या हल्ल्यात आर्यन चा मृत्यू झाला. Chandrapur murder

आर्यन चा खून करीत तिघेही दुचाकीने पळून गेले, हत्येच्या या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली त्यांनी तांत्रिक व कौशल्यपूर्ण तपास करीत तेलंगणा राज्यात पळून जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजुरा मधून अटक केली.

आरोपी मध्ये 28 वर्षीय अश्विन उर्फ बंटी राजेश सलमवार महाकाली कॉलरी, 19 वर्षीय जॉन विलास बोलीवार लालपेठ कॉलरी क्रमांक 1, 24 वर्षीय जसीम नसीम खान, जमन जट्टी दरगाह यांना अटक करण्यात आली. आरोपीनी आर्यन चा खून केला अशी कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हा घडल्यावर अवघ्या 2 तासात 3 आरोपीना अटक केली हे विशेष.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दीपक कांकेडवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, पोलीस कर्मचारी सुभाष गोहोकार, संतोष एलपूलवार, गोपीनाथ नरोटे, गोपाल आतकुलवार, मिलिंद जांभुळे व दिनेश अराडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने