Ballarpur crime : 6 तलवारी आणि बाप-लेकावर गुन्हा

Ballarpur crime : 6 तलवारी आणि बाप-लेकावर गुन्हा

 Ballarpur crime बल्लारपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात केलेल्या छापामार कारवाईत 6 तलवारी, भाला व कुकरी जप्त करण्यात आली असून सदर प्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ballarpur crime


जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात यावी यासाठी चंद्रपूर पोलीस दल कारवाईची मोहीम राबवित आहे, या मोहिमेचा एक भाग म्हणून बल्लारपूर पोलिसांनी सदर कारवाई केली आहे. Ballarpur crime

9 ऑक्टोबर रोजी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीराम वार्डातील बर्डे यांच्या घरी अवैध शस्त्र लपवून ठेवले आहे, या आधारावर पोलिसांनी त्याठिकाणी धाड मारली, या धाडीत 6 लोखंडी तलवार, 1 कुकरी व 1 भाला जप्त करण्यात आला.

अवश्य वाचा : सुगंधित तंबाखू तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेचा दणका

मुद्देमाल जप्त करीत 58 वर्षीय प्रमोद श्रीहरी बरडे व 30 वर्षीय आकाश उर्फ पिंटू प्रमोद बरडे या बाप-लेकावर भारतीय हत्यार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली. सदर प्रकरणी वडील प्रमोद बरडे पसार आहे. Ballarpur crime

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहायक पोलिस निरीक्षक टोपले, पोउपनी हुसेन शहा, पोलीस कर्मचारी गजानन डोईफोडे, आनंद परचाके, रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनील कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, शेखर माथनकर, शरदचंद्र कारुष, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलिंद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हाण, अनिता नायडू, वामन शेंडे, भास्कर कुंदावार, परमवीर यादव, कैलास चिंचवलकर, विकास खंदार, विना एलकुलवार यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने