Chandrapur Gambling : चंद्रपुरात या फार्म हाऊसवर रंगला अराजकीय जुगार

Chandrapur Gambling : चंद्रपुरात या फार्म हाऊसवर रंगला अराजकीय जुगार

 Chandrapur gambling  चंद्रपूर : किटाळी येथील रोडे फार्महाऊमध्ये सुरु असलेल्या जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास धाड टाकून नऊ जणांना अटक केली. या कारवाईत एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Chandrapur gambling


जयदीप प्रकाश रोडे (४०), शिवराज शामराव बांधुरकर (४४), अरविंद रामकृष्ण कुचनकर (३८), अमित विठ्ठलराव चिकणकर (३९), लव्ह शंकर गौरकर (३८), महेश वामनराव ठेमसरक (४१), जित चाको सॅम (३५), राहुल रामचंद्र झाडे (३७), सुभाष तुळशिराम पोईनकर (४१) असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. Chandrapur gambling

कोयता, तलवार व बंदूक सह एकाला अटक, गडचांदूर पोलिसांची कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुर्गापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिग करत असताना रोडे फार्म हाऊस येथील वरच्या खोलीत जुगार सुरु असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाड टाकली. यावेळी नऊजण जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी जुगाराचे साहित्य, रोकड असा एक लाख दोन हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन नऊही जणांवर गुन्हा दाखल केला. कारवाई केल्यावर आरोपी जुगार बहाद्दर यांना सुचनापत्र देत सोडण्यात आले.

विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी शहरातील पडोली येथील समृद्धी बार मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने धाड मारत राजकीय पदाधिकारी यांचा जुगार स्थानिक गुन्हे शाखेने पकडला होता, मात्र राजकीय व्यक्तीवर कारवाई झाली की स्थानिक गुन्हे शाखा याबाबत प्रसिद्धी पत्रक काढायला विसरते, या प्रकरणात सुद्धा हेच झालं आहे, रात्री 12 वाजता झालेल्या या कारवाईचे साधे प्रसिद्धी पत्रक स्थानिक गुन्हे शाखेला जाहीर करता आले नाही, यावर सामान्य नागरिक अश्या गुन्ह्यात अडकला की त्याबाबत तात्काळ माहिती मिळते मात्र राजकीय व्यक्ती अश्या प्रकरणात अडकली कीं त्याबाबत ब्र सुद्धा काढल्या जात नाही.

सध्या पोलीस विभाग न्यायाच्या दोन बाजू दाखवीत असल्याचे चित्र निर्माण करताना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने