Chandrapur : अनंतचतुर्दशीला चंद्रपूर जिल्ह्यात खुनी थरार

Chandrapur : अनंतचतुर्दशीला चंद्रपूर जिल्ह्यात खुनी थरार

 Chandrapur अनंतचतुर्दशी ला एकीकडे चंद्रपूर शहरात गणपती बाप्पा चा विसर्जन सोहळा सुरू होता तर दुसरीकडे जिल्ह्यातील गोंडपीपरी येथील सकमुर गावात दारू विक्रेत्याने पोलीस पाटलावर चाकूने हल्ला करीत जखमी केले, त्यानंतर सदर बाब गावकऱ्यांना कळताच गावात तणाव निर्माण झाला.

Chandrapur


Chandrapur अवैध दारू विक्रेत्या कडून पोलीस पाटलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावात काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली, इरफान शेख असे आरोपीचे नाव असून तो राजूरा शहरातील आहे. या आरोपीने या परिसरात दहशत पसरवली आहे. घटनेची माहिती मिळताच गोंडपिपरी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन दोन आरोपींना ताब्यात घेतले. पोलीस पाटलावर चाकू हल्ला झाल्याने गावकरी संतापले आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.  


पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात 

गोंडपिपरी तालुक्यातील सकमपूर गावात काल सायंकाळी एका दारूविक्रेत्याने तेथील पोलिस पाटलावर चाकू हल्ला केला. या मध्ये पोलिस पाटील जखमी झाला. या घटनेची माहिती गावकऱ्यांना होताच गावकरी प्रचंड संतापले. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आरोपीला ताब्यात घेतले. तो पर्यंत या घटनेने प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आरोपीला गाडीत बसविल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी आरोपीला आमच्या हवाली करा. मुख्य आरोपीला अटक करा, ही मागणी जोरदारपणे लावून धरली.‍ आणि गावकऱ्यांनी पोलिसांची गाडी अडवून धरली. त्यामुळे अधिकच तणाव निर्माण झाला. नागरिकांनी पोलिसांच्या वाहनाची टायर मधील हवा सोडली.


Chandrapur  पोलिसांचा गाडीचे काचा फोडल्या. त्यामुळे लगेच अतिरिक्त पोलिसांना बोलाविण्यात आले. यावेळी एक व्यक्ती पोलिसांच्या वाहनात सापडल्याने एक गावकरी गंभीर जखमी झाला. तत्काळ जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे तणावात आणखी भर पडली. गावाकऱ्यांनी पोलिसांच्या गाड्या रात्रीपर्यंत अडवून ठेवल्या होत्या. सध्या तणावाची स्थिती असल्याने अतिरिक्त पोलीस दलाला पाचारण करण्यात आले. 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने