illegal weapon : तलवार, कोयता व पिस्तुल सहित एकाला अटक

illegal weapon : तलवार, कोयता व पिस्तुल सहित एकाला अटक

 illegal weapon कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी गडचांदूर पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांनी महत्वाचे पाऊल उचलत तलवार, कोयता व पिस्तुल सहित एका आरोपीला अटक केली.

Illegal weapon


illegal weapon गडचांदूर पोलिसांना 19 सप्टेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा शहरात अवैध शस्त्र बाळगून आहे, माहितीच्या आधारे गडचांदूर पोलिसांनी बंगाली कॅम्प लोडर कालोनि येथे धडक देत 22 वर्षीय अभिषेक शत्रुघ्न सिंग यांच्या घराची झडती घेतली असता त्यामध्ये लोखंडी तलवार, लोखंडी कोयता, एक काळ्या रंगाची पिस्तुल रिकाम्या मॅगझीन सहित जप्त करण्यात आली.पोलिसांनी यावेळी एकूण 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


हे ही वाचा : अनंतचतुर्दशी ला चंद्रपूर जिल्ह्यात खुनी थरार 

सदर शस्त्र कुठून आले, परवाना आहे काय याबाबत विचारणा केली असता अभिषेक ने उडवाउडवीची उत्तरे दिली, सदर जप्त करण्यात आलेली शस्त्रे ही अवैधरित्या बाळगल्याप्रकरणी गडचांदूर पोलिसांनी आरोपी अभिषेक सिंग ला अटक केली.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, पोलीस कर्मचारी शीतल बोरकर, राठोड, संदीप थेरे, तिरुपती माने, सुभाष तिवारी, महेश चव्हाण, रामसिंग पवार, मनीषा झोडे, प्रकाश इखारे यांनी केली.

प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष बोरकर करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने