Mephedrone : चंद्रपुरात पुन्हा मॅफेड्रोन पावडर जप्त

Mephedrone : चंद्रपुरात पुन्हा मॅफेड्रोन पावडर जप्त

 Mephedrone काही वर्षांपूर्वी तब्बल 20 लाखांचे मॅफेड्रोन नामक अंमली पदार्थ स्थानिक गुन्हे शाखेने पडोली चौकात पकडले होते, त्यावेळी 2 आरोपीना अटकही करण्यात आली होती.

Mephedrone drugs


आता तब्बल 1 ते दीड वर्षांनंतर पुन्हा चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने मॅफेड्रोन पावडर जप्त केले आहे.  अंमली पदार्थ, गुन्हेगारी विरोधात चंद्रपूर पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे, सदर मोहीम यशस्वीपणे पार पाडावी यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक स्थापन केले आहे.

अवश्य वाचा : चंद्रपुरात 400 रुपयासाठी युवकाची हत्या

Mephedrone आज 5 सप्टेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की तुकुम तलाव जवळ राहणारा मोहम्मद अहमद सिद्दीकी अन्सारी हा चंद्रपुरातील वरोरा नाका पुलियाजवळ मॅफेड्रोन पावडर सोबत घेत विक्री करण्याकरिता येत आहे.

माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला सदर आरोपी त्याठिकाणी दाखल होताच त्याला ताब्यात घेत झडती घेतली असता त्याच्याजवळ MD मॅफेड्रोन पावडर 6.470 ग्राम किंमत 19 हजार 410 रुपयांचे आढळून आले, सदर मॅफेड्रोन शरीरात घेण्याकरिता आवश्यक असलेले इंजेक्शन सिरीन किंमत 100 रुपये जप्त करण्यात आले.

आरोपी सिद्दीकी अन्सारी वर NDPS ऍक्ट प्रमाणे पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र ते पावडर कुणाला विकणार होता याबाबत सध्या तरी काही माहिती मिळाली नाही.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर सामलवार, संतोष एलपुलवार, किशोर वकाटे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे, शशांक बदामवार, मिलिंद टेकाम, उमेश रोडे, वैभव पत्तीवार यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने