Color Prediction Game : जुगाराचा नवा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात

Color Prediction Game : जुगाराचा नवा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात

 Color Prediction Game जुगार, सट्टा, ऑनलाइन रम्मी, क्रिकेट बुकीं नंतर आता कलर प्रेडिक्शन गेम नामक जुगाराचा प्रकार आता चंद्रपुरात पण सुरू झाला आहे, पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार आता स्थानिक गुन्हे शाखेने या ऑनलाइन खेळाडूंवर ऑफलाईन कारवाई करीत मुसक्या आवळण्याचे काम सुरू केले आहे.

Color Prediction Game

Color Prediction Game 14 सप्टेंबर रोजी सकमुर तालुका गोंडपीपरी मध्ये कलर प्रेडिक्शन जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.

अवश्य वाचा : मारहाण करीत महिलेवर बलात्कार

विसंबा काल्पनिक नाव शक्तिमान हा मोबाईल वर ऑनलाइन पध्दतीने कलर प्रेडिक्शन गेम वर हार जित चा खेळ पैसे लावून खेळवित होता, स्थानिक गुन्हे शाखेने त्याठिकाणी रेड केल्यावर तिथे एक मोबाईल, लॅपटॉप असा एकूण 38 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक मधुकर सामलवार, जयंता चुनारकर, चेतन गज्जलवार, किशोर वकाटे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे यांनी केली.


काय आहे कलर प्रेडिक्शन गेम?

हा खेळ एकूण 6 रंगाचा असतो, यामध्ये युजर खेळणार्यांना रंग निवडण्यास सांगतो, व त्यावर पैसे लावण्यास सुद्धा निर्देश देतो, जर कलर कॉम्बिनेशन जुळला तर युजर त्यावर पैसे जिंकतो, कलर प्रेडिक्शन हा ऑनलाइन जुगाराचा प्रकार आहे, यामध्ये आपण जिंकू शकता व खूप सारे पैसे हारु शकता, हिरवा, लाल, निळा, गुलाबी, पांढरा व पिवळा या रंगात रंगून खेळणारे संपूर्ण पैसे हरू शकतो.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने