Chandrapur murder : पतीने केली पत्नीची क्रूर हत्या

Chandrapur murder : पतीने केली पत्नीची क्रूर हत्या

 Chandrapur murder कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीला सुऱ्या ने वार करीत तिची क्रूरपणे हत्या केल्याची घटना कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुळेसावली येथे घडली.

वंदना धनपाल रामटेके (60) रा. कुडेसावली असे मृत महिलेचे नाव आहे याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पती धनपाल माधव रामटेके 67 याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. 

Chandrapur murder


Chandrapur murder धनपाल व त्याची पत्नी वंदना सोबत वारंवार भांडणे व्हायची, दोघांचा वाद रोज वाढत होता, मृतक वंदना ला दुर्धर आजार असल्याची माहिती पुढे आली आहे. गुरुवारी सकाळी सुद्धा  त्या दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान वंदना भांडे घासत असताना धनराज ने धारदार सुऱ्याने वार करीत सुरा तिच्या पाठीत भोसकला. ती मागे वळली असता पुन्हा तो सुरा पोटात भोसकला. त्यानंतर तिने हात समोर केला असता हातावरही वार केला. रक्ताच्या थारोळ्यात वंदना कोसळली. 

अवश्य वाचा : चंद्रपुरात केबल चालकाच्या घरी घरफोडी

त्यानंतर आरोपीने रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या पत्नीला रस्त्यावर नेले, कुणी गावकरी जर तिला वाचवायला पुढे आला तर त्याला सुद्धा ठार करू अशी धमकी धनपाल ने गावकऱ्यांना दिली, त्यामुळे कुणीही पुढे यायची हिम्मत केली नाही.

अवश्य वाचा : 400 रुपयासाठी युवकाची हत्या

काही वेळाने गावकऱ्यांनी एकजुटता दाखवीत वंदना ला कोठारी येथील रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बल्लारशा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच कोठारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश खरसान आपल्या घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतकाचा पती धनपाल रामटेके याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार योगेश खरसान करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने