Chandrapur rape : मारहाण करीत महिलेवर बलात्कार, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

Chandrapur rape : मारहाण करीत महिलेवर बलात्कार, चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

 Chandrapur rape दोन वर्षे जुनी ओळख आणि बलात्काराला निमित्त ठरला वाढदिवस, वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने विधवा महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे घडली.

Chandrapur rape


Chandrapur rape वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने शहराबाहेर नेऊन एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याची घटना गुरूवारी (दि. ११) शहरात उघडकीस आली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक केली. रवींद्र सोनटक्के (३८, कोरपना) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी सोनटक्के व पीडित महिला हे एकमेकाला दोन वर्षांपासून ओळखतात. याच ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने स्वत:चा वाढदिवस साजरा करण्यास शहराबाहेर चालण्याचा आग्रह केला. तेव्हा फिर्यादी पीडिताने आपल्या सोबत मैत्रिणीलाही घेतले. 

अवश्य वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या


सोमवारी (दि. ९) सायंकाळी हे तिघेही मानोरा जंगल शिवाराकडे गेले. तिथे आरोपीने महिलेला मारहाण करून अत्याचार केला. मदतीसाठी धावलेल्या मैत्रिणीलाही मारहाण केली. पीडिताच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुरूवारी रवींद्र सोनटक्के याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार बिपिन इंगळे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने