A gang of thieves : आणि ती चोरांची इलेक्ट्रॉनिक गँग पुन्हा चंद्रपुरात आली

A gang of thieves : आणि ती चोरांची इलेक्ट्रॉनिक गँग पुन्हा चंद्रपुरात आली

 A gang of thieves काही वर्षांपूर्वी चंद्रपुर शहरातील इंदिरानगर परिसरात तामिळनाडू येथील काही युवक घरी कुणी नसल्याची संधी साधत लॅपटॉप व मोबाईल चोरत होते, त्या युवकांना कुणी पकडल्यास ते मूक-बधिर असल्याचे भासवीत होते, त्यावेळी रामनगर पोलिसांनी कसोशीने तपास करीत आरोपी युवकांना अटक केली होती, मात्र आता पुन्हा त्या चोरीचा पॅटर्न राबवित त्याचप्रमाणे चोरी चंद्रपूर शहरात करायला लागले यावेळी चोरांची टोळी पोलिसांच्या हाती लागली.

A gang of thieves


23 सप्टेंबर रोजी समाधी वार्ड येथील 29 वर्षीय समाधान चुधरी हे आपल्या मित्रांसह प्रेमीला अपार्टमेंट मध्ये किरायाने राहतात, सकाळी 6 वाजता समाधान चुधरी हे आझाद गार्डन येथे फिरायला गेले होते, त्यावेळी त्यांचे इतर 2 मित्र झोपून होते, समाधान यांनी घरातील दरवाजा टेकवून गेले, समाधान परत आल्यावर लॅपटॉप, टॅब व मोबाईल त्यांना कुठेही आढळून आला नाही, त्यांचे मित्र त्यावेळी झोपून होते, घरातून 1 लाख 18 हजारांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला अशी फिर्याद समाधान यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली. A gang of thieves

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपासाला गती दिली, सीसीटीव्ही व गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी परिश्रम करीत 4 युवकांना अटक केली, ज्यामध्ये 22 वर्षीय कार्तिक शंकर, 26 वर्षीय सत्तीकुमार सनकरण बोट्टू, 25 वर्षीय मंगेश पेरूमल नल्लामनशुशान, 20 वर्षीय सतीश मुन्नास्वामी सल्लापुरी चारही राहणार तामिळनाडू यांचा समावेश आहे.

समाधान चुधरी यांच्या घरून चोरी गेलेले मोबाईल, टॅब व लॅपटॉप आरोपिकडून जप्त करण्यात आला, चोरी करणारे युवकाची ही टोळी असून ते फक्त चोरी करण्यासाठी चंद्रपुरात आले होते, सदर चारही युवक बल्लारपूर येथे किरायानरूम करून राहत होते, त्यांची चोरीची वेळ ही सकाळी 6 ते 9 असायची, इलेक्ट्रॉनिक वस्तू चोरी करीत ते सर्व साहित्य चोर बाजार चेन्नई येथे विकत होते. A gang of thieves

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सपोनि मंगेश भोंगाडे, सपोनि निलेश वाघमारे, कपूरचंद खरवार, सचिन बोरकर, भावना रामटेके, संतोष कणकम, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, रुपेश रणदिवे, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने