Chandrapur Murder : चंद्रपुरात भावाने केली भावाची हत्या

Chandrapur Murder : चंद्रपुरात भावाने केली भावाची हत्या

 Chandrapur murder चंद्रपूर - शहरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मागे उडिया मोहल्ला येथे राहणारे गणेश गेडाम यांची सख्ख्या भावाने कुऱ्हाडीने वार करीत हत्या केली.

Chandrapur murder


7 ऑगस्ट ला रात्री 10 वाजता गणेश पुंडलिक गेडाम हा घरी जेवण करीत होता, त्यावेळी त्याचा भाऊ मंगल पुंडलिक गेडाम घरी आला, त्यावेळी मंगल हा दारू च्या नशेत होता, त्याने भावाला शिवीगाळ करीत वाद सुरु केला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले, त्यानंतर तिथे ठेवलेली कुर्हाडीने गणेश च्या गळा व डोक्यावर वार केला, या हल्ल्यात गणेश जमिनीवर कोसळला, रक्तबंबाळ अवस्थेत वार्डातील रहिवाश्यांनी गणेश ला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेत असताना वाटेत गणेश यांचा मृत्यू झाला.

गुन्हेगारी - चंद्रपूर जिल्ह्यात पिस्टल व तलवार सहित 3 आरोपीना अटक

Chandrapur murder घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ आरोपी मंगल गेडाम ला अटक केली.

उत्तरीय तपासणीसाठी गणेश चा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने