Chandrapur crime : अबब...चंद्रपुरात बाराशे किलो गोमांस जप्त

Chandrapur crime : अबब...चंद्रपुरात बाराशे किलो गोमांस जप्त

 Chandrapur crime महाराष्ट्र राज्यात गो हत्या व गोमांस वाहतुकीला बंदी असताना सुद्धा छुप्या मार्गाने सदर गोमांस वाहतूक केल्या जाते.

गोमांस वाहतूकीची गोपनीय माहिती 4 ऑगस्टला शहर पोलिसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे शहर पोलिसांनी पठाणपुरा गेट ते शाही दरगाह मार्गावर सापळा रचला, काही वेळाने चारचाकी वाहन क्रमांक TS12UC 3236 हे संशयास्पद रीतीने येत होते, सदर वाहनाला थाम्बवीत त्याची चौकशी केली असता वाहनात गोवंशाचे मांस व गाय, बैल व वासरू चे मांस अंदाजे वजन 1270 किलो आढळून आले. मांसाला बर्फाच्या लादीत झाकण्यात आले होते.

Beef


Chandrapur crime पोलिसांनी पंचनामा करीत वाहन चालक 38 वर्षीय मोहम्मद उमर मोहम्मद चांद राहणार श्रीराम कॉलोनी जलपल्ली तेलंगणा, 32 वर्षीय साजिद अब्दुल रज्जाक कुरेशी रा.चंद्रपूर, 20 वर्षीय निजाम हमीद शेख, रा.गडचांदूर, 19 वर्षीय असरार अहमद अब्रार अहमद रा. तेलंगणा, 40 वर्षीय अब्रार अहमद मोहम्मद रुकनोद्दीन, हैद्राबाद याना ताब्यात घेण्यात आले.

सदर गोवंशाचे मांस तेलंगणा राज्यात जाणार होते. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वाखाली सपोनि मंगेश भोंगाडे, पोउपनी संतोष निंभोरकर, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, संतोष पंडित, सचिन बोरकर, निलेश मुडे, भावना रामटेके, इम्रान खान, रुपेश पराते, संतोष कावळे, मंगेश मालेकर, शाहबाज सैययद, दिलीप कुसराम, इर्शाद शेख, रुपेश रणदिवे व राहुल चिताडे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने