Crime Branch : देशी कट्टा घेऊन तो मैदानात आला आणि घडलं असं...

Crime Branch : देशी कट्टा घेऊन तो मैदानात आला आणि घडलं असं...

 Crime branch चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या अवैध धंदे व अवैध हत्यार बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत त्यावर कारवाई करण्याची मोहीम सध्या स्थानिक गुन्हे शाखा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार करीत आहे.

Chandrapur lcb


स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात धरपकड मोहीम सुरू आहे.

 Crime branch या मोहीमे दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की बल्लारशाह येथील भगतसिंग वार्डातील वेकोलीच्या मैदानावर एक इसम आपल्या कमरेला गावठी देशी कट्टा लावून उभा आहे, सदर माहितीवरून पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले त्यांच्या टीम सह बल्लारपूर येथे दाखल झाले.

अवश्य वाचा : शहरात घरफोडी, रामनगर पोलिसांचा कौशल्य पूर्ण तपास

त्या इसमाला गुन्हे शाखेने ताब्यात घेत विचारपूस करीत चौकशी केली असता त्याच्या पँटमध्ये 7 मग जिवंत काडतुसे व एक मग खाली केस मिळून आले.

अवैध हत्यार बाळगणारा 24 वर्षीय रोहित शिवप्रसाद निषाद याला ताब्यात घेत त्याच्यावर आर्म ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोउपनी विनोद भुरले, दीपक डोंगरे, सतीश अवथरे, संतोष एलपुलवार, गोपाळ आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावे व गणेश भोयर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने