Ram Nagar Police : शेट्टी ची हातसफाई ठरली फोल, रामनगर पोलिसांनी केली अटक

Ram Nagar Police : शेट्टी ची हातसफाई ठरली फोल, रामनगर पोलिसांनी केली अटक

 Ram nagar police चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे, अशीच एक घटना चंद्रपूर शहरातील अरविंद चौक, सरकार नगर येथे जयस्वाल यांच्या घरी घरफोडी करण्यात आली, विशेष म्हणजे त्यावेळी फिर्यादी अजय जयस्वाल हे घरी झोपून होते, मध्यरात्री जयस्वाल याना जाग आली असता घरातील ऑटो लॉक तोडून अज्ञाताने चोरी केली असे त्यांच्या लक्षात आले.

Chandrapur crime


Ram nagar police याबाबत जयस्वाल यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली की 26 जुलै ला रात्री घरी चोरी झाली त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने, रोख 4 लाख 32 हजार असा एकूण 5 लाख 22 हजार रुपयांचा माल लंपास करण्यात आला.

तक्रार दाखल होताच रामनगर पोलिसांनी तपास सुरू केला, गुन्हे शोध पथकातील अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पाहणी केली, त्यानंतर गोपनीय माहिती घेत कौशल्यपूर्ण तपास करीत 49 वर्षीय रमेश उर्फ शेट वेलादन शेट्टी राहणार इंदिरा रामनगर चंद्रपूर याला ताब्यात घेण्यात आले.

आरोपीला पोलीसी खाक्या दाखविताचं त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली, आरोपी कडून रोख 1 लाख 70 हजार व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 57 हजार 740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गाडे, यशवंत कदम, गुन्हे शोध पथकाचे सपोनि देवाजी नरोटे, पोउपनी मधुकर सामलवार, दीपेश ठाकरे, पेतरस सिडाम, शरद कुडे, सचिन गुरनुले, आनंद खरात यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने