Crime news : चंद्रपुरात पिस्टल व तलवारसहित 2 आरोपीना अटक

Crime news : चंद्रपुरात पिस्टल व तलवारसहित 2 आरोपीना अटक

 Crime news चंद्रपूर जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे.

सध्या जिल्ह्यातील गुन्हेगारी वृत्तीवर स्थानिक गुन्हे शाखा मुसक्या आवळण्याचे काम करीत आहे.

Local crime branch

चंद्रपुरात 1200 किलो गोमांस जप्त

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेला दिले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 6 ऑगस्टला राजुरा येथील दीपक उमरे हल्ली मुक्काम लखमापूर चंद्रपूर यांच्याकडून एक गावठी बनावटी देशी कट्टा व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

Crime news सोबतच त्या ठिकाणी राहणारा विक्रम जुनघरे याच्या घरून एक लोखंडी तलवार व मॅन सहित जप्त केले.

बल्लारपूर शहरात देशी कट्टा सहित एकाला अटक

सदर हत्यार कुणाकडून घेतले याबाबत स्थानिक गुन्हे शाखा तपास करीत आहे, आरोपीना रामनगर पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेने मोहीम राबवित महिन्याभरात 3 पिस्टल व 1 धारदार तलवार जप्त केली.


गावठी पिस्टल कारवाई मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने एकूण 26 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, किशोर वैरागडे, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, संजय वाढई, प्रकाश बलकी, सुभाष गोहोकार, नितीन साळवे, गणेश भोयर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने