sentenced : घुग्गुस येथे वयोवृद्ध महिलेवर 22 वर्षीय युवकाने केला अत्याचार

sentenced : घुग्गुस येथे वयोवृद्ध महिलेवर 22 वर्षीय युवकाने केला अत्याचार

 sentenced वर्ष 2021 मध्ये शांतीनगर जवळ पहाटे 5 वाजता वयोवृद्ध महिला शौचास गेली असता तिच्यावर 22 वर्षीय युवकाने अत्याचार केला, या घटनेनें घुग्गुस शहर हादरून गेले होते, पोलीस तक्रार झाल्यावर आरोपीला तात्काळ अटक झाली, न्यायालयाने आरोपी युवकाला 12 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

Punishment of the accused


sentenced पहाटे 5 वाजता पीडित वयोवृद्ध महिला शौचासाठी गेली असता आरोपी 22 वर्षीय युवक मोहम्मद यासिन नूर इस्लाम शेख याने महिला एकटी असल्याचा फायदा उचलत तिच्यावर अत्याचार केला, पीडित महिलेने याबाबत घुग्गुस पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक मेघा गोखरे यांनी केला, आरोपीला अटक करीत त्याच्यावर कलम 376, 354 अ, 354ब, ड, 376 1, 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

चंद्रपुरात भावाने केली भावाची हत्या

3 वर्षे चाललेल्या या खटल्यात सत्र न्यायाधीश देव मॅडम यांनी आरोपी मोहम्मद यासिन नूर इस्लाम शेख ला दोषी मानत 12 वर्षे शिक्षा, 25 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 6 महिन्याची अतिरिक्त शिक्षा तसेच कलम 506 अंतर्गत 1 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 15 दिवसाची शिक्षा सुनावण्यात आली.

घुग्गुस पोलिसांनी त्यावेळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले त्यामुळे 22 वर्षीय नराधम युवकाला शिक्षा झाली.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने