Illegal liquor seller : सोमनाथ मार्गावर अवैध दारू विक्री, मूल पोलिसांनी केली कारवाई

Illegal liquor seller : सोमनाथ मार्गावर अवैध दारू विक्री, मूल पोलिसांनी केली कारवाई

 Illegal liquor seller मूल - शहरातील मांरोडा सोमनाथ रोडवर असलेल्या पानठेल्यावर अवैध दारू विकल्या जात होती. मुल पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केली आहे. त्यामुळे मूल शहरात अवैध दारू विक्री करीत असलेल्या सर्व अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

Chandrapur police


पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन चंद्रपुर, उप विभागीय पोलीस अधिकारी एस. एस. भगत. यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी पोस्टॉफ सफौ उत्तम कुमरे पोहवा भोजराज मुडरे, सचिन सायंकार, नापोअं चिमाजी देवकते चालक स्वप्नील खोब्रागडे सह मुल टाउन परिसरात पायदळ पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहीती व्दारे माहीती मिळाली कि सोमनाथ रोड मुल येथील पानठेला चालक नामे मंगेश सुधाकर मडावी वय २६ वर्ष, रा. मुल वार्ड क. १ हा आपले पानठेल्यात अवैदयरित्या दारू ची विक्री करीत आहे अश्या माहिती वरून त्याचे पानठेल्याची झडती घेतली असता त्याचे पानठेल्यामध्ये एका प्लॉस्टीक थैलीत ७४ नग रॉकेट संत्र कंपनिच्या प्रत्येकी ९० एम एल नी भरलेल्या किमत २,५९०/- रू चा मुददेमाल मिळुन आला. 


Illegal liquor seller तसेच त्याचे बाजुला असलेला पानठेला चालक नामे प्रदिप लिलाधर शेडे वय ३८ वर्ष रा. वार्ड क्र.२ मुल याचे पानठेल्याची झडती घेतली असता त्याचे पानठेल्यामध्ये असलेल्या फिज मध्ये एका प्लॉस्टीक थैलीत देशी व विदेशी दारूच्या शिश्या मिळुन आल्या. त्यात ६ नग रॉयल स्टॅग कंपनिची विदेशी दारू प्रत्येकी १८० एम.एल नि भरलेल्या किमंत १०८०/-रू २) ११ नग रॉकेट देशी दारू संत्र कपनिच्या प्रत्येकी ९० एम.एल.च्या किमत ३८५/-रू चा व दारू ठेवण्याकरीता वापरलेली WHIRIPOOL फिज किमत अंदाजे १०,०००/-रू चा मुददेमाल मिळुन आला असा एकुण दोन्ही गुन्हयाचा मुद्देमाल किमत १४,०५५/- रू चा मुददेमाल मिळुन आल्याने नमुद दोन्ही आरोपीतांनवर गुन्हा नोद करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने