Cctv footage : कुणी ठेवली बॉम्बसदृश्य वस्तू? बघा सीसीटीव्ही

Cctv footage : कुणी ठेवली बॉम्बसदृश्य वस्तू? बघा सीसीटीव्ही

 Cctv footage चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरातील गजबजलेल्या भगवती व्यापार संकुल समोर 30 जुलैला 3.30 वाजताच्या सुमारास बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.



बघा हा व्हिडीओ, क्लिक करा

सध्या बॉम्ब स्कॉड पथक गडचांदूर येथे दाखल झाले आहे, सध्या त्या वस्तूची तपासणी करण्यात येत आहे, आज बाजाराचा दिवस असल्याने नागरिकांची गर्दी उसळली होती, भगवती व्यापार संकुल समोर एका पिशवीमध्ये ती बॉम्ब सदृश वस्तू आहे, पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन हे सुद्धा घटनस्थली दाखल झाले आहे.

याबाबत सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे ज्यामध्ये एक युवक चेहऱ्याला रुमाल बांधून बॉम्ब सदृश्य पिशवी दुकानात ठेवत आहे, सध्या पोलीस व बॉम्ब शोध पथकाने बंकर तयार केलं असून त्या  वस्तूची तपासणी केल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने