Chandrapur jugar : पुराच्या वेढ्यात जुगाराचा पूर, 4 जुगार बहाद्दर ताब्यात

Chandrapur jugar : पुराच्या वेढ्यात जुगाराचा पूर, 4 जुगार बहाद्दर ताब्यात

 Chandrapur jugar चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे पावसाने थैमान घातले होते, अनेक ठिकाणी पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले मात्र या सर्व नैसर्गिक संकटाचा फायदा घेत किटाळी येथील शेत शिवारात जुगाराचा पूर आला.

Gambling


या जुगाराच्या पुरात दुर्गापूर पोलिसांनी उडी घेत 21 जुलैला सायंकाळी 7 वाजता धाड मारली, अचानक पडलेल्या धाडीला घाबरत काहींनी तिथून पळ काढला मात्र यामध्ये धनराज दिगंबर सावरकर रा. ताडबन, रणजित राजेंद्र रामटेके, सतीश गुमनेवार व जुगार आयोजक जाकीर अनवर हुसेन ला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Chandrapur jugar सध्या चंद्रपूर जिल्ह्यात पुराचा वेढा पडलाय मात्र या वेढ्यात जुगार बहाद्दर आपला ठिकाण शोधतातचं, असाचं एक ठिकाणा दुर्गापुरातील सट्टा व जुगारात मास्टर असलेल्या जाकीर ने किटाळी येथे सुरू केला, या जुगारात आपण मजल मारावी म्हणून धनराज दिगंबर सावरकर हे आपलं नशीब आजमावण्यासाठी गेले, कटपत्ता सुरू होता, मात्र तितक्यात दुर्गापूर पोलिसांनी छापामार कारवाई केली, यामध्ये काही पळून गेले तर खेळाचे प्रमुख आयोजक जाकीर हा पोलिसांच्या तावडीत सापडला.

दुर्गापूर पोलिसांनी या कारवाईत 6 हजार 60 रुपये रोख, 52 पत्ते व 8 मोटारसायकल असा एकूण 4 लाख 46 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

ताब्यात घेतलेल्या आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक लता वाढीवे, पोलीस उपनिरीक्षक गिरीश मोहतुरे, पोलीस कर्मचारी योगेश शार्दूल, मंगेश शेंडे, प्रमोद डोंगरे, किशोर वलके यांनी केली अशी माहिती दुर्गापूर पोलिसांनी 22 जुलैला दुपारी 12.30 वाजता दिली.

सदर जुगार कारवाईत माजी नगरसेवक धनराज सावरकर असा उल्लेख झाला असल्याने त्याबाबत आम्ही दिलगिरी व्यक्त करीत आहो, सदर जुगाराबाबत माहिती प्राप्त झाली तशी बातमी प्रसारित करण्यात आली होती, कुणाचीही बदनामी व्हावी असा आमचा हेतू नव्हता, त्याबाबत दिलगिरी.....एकाच नावाचे 2 व्यक्ती असल्याने तसा प्रकार घडला..सदर संपूर्ण बातमी पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार होती.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने