Crime News : दारू मुळे मुलाने केली वडिलाची हत्या

Crime News : दारू मुळे मुलाने केली वडिलाची हत्या

Crime newsचंद्रपूर:दारू पिऊन घरी येतो, भांडण करतो या कारणावरून मुलगा अमित अशोक रामटेके (२४) याने वडील अशोक आबाजी रामटेके यांना मारहाण केली. या मारहाणीत वडील अशोक रामटेके यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी सिंदेवाही पोलिसांनी वडीलांच्या हत्ये प्रकरणी मुलाला अटक केली आहे. सदर घटना सोमवार २२ जुलैच्या दुपारची आहे.

Chandrapur crime


Crime news म्हणतात ना गुन्ह्याला कारण नसते असाच एक गुन्हा नेहमीच्या वादातून घडला, वडीलाला दारूचे व्यसन, नेहमी भांडण रोज होणाऱ्या त्रासापासून मुक्तता व्हावी यासाठी मुलगा वडिलांसोबत वाद घालतो, मात्र वादाचे रूपांतर हाणामारीत होते, आणि या हाणामारीत वडीलाचा मृत्यू होतो.

अवश्य वाचा : माजी नगरसेवक रंगला जुगार कार्यक्रमात, तितक्यात पोलिसांनी मारली धाड

ही घटना घडली आहे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा या गावी वडील अशोक रामटेके यांच्या दारूच्या व्यसनाने कुटुंब चिंतीत होते , व्यसनामुळे नेहमी वाद व्हायचे.


पोलीस ठाणे सिंदेवाही हदीतील मौजा वासेरा येथील पोलीस पाटील देवेंन्द्र तलांडे यानी फोनवरूण ठाणेदार तुषार चव्हाण ठाणेदार यांना माहीती दिली. आंबेडकर चौक वार्ड क २ वासेरा येथे अमित अशोक रामटेके रा वासेरा, याने वडीलांला मारहान करूण गंभीर जखमी केले आहे. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर जखमी अशोक रामटेके यांना रूग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी रामटेके यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी मुलगा अमित अशोक रामटेके, रा. वासेरा याचेविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वरील आरोपीस पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास ठाणेदार तुषार चव्हाण करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने