Arm Act offence : चंद्रपुरात 2 तलवारी जप्त

Arm Act offence : चंद्रपुरात 2 तलवारी जप्त

 Arm Act offence 20 जून रोजी चंद्रपूर शहर पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यावेळी गोपनीय माहिती मिळाली की एकाने घरी तलवारी आणून ठेवल्या असून त्याचा वापर होण्याची शक्यता आहे.

Arm act


माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर व डीबी पथकाने लालपेठ कॉलरी वेकोली क्वार्टर टाइप A क्रमांक 20 चंद्रपूर येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार 36 वर्षीय साहिल विश्वजित सिंग धंदा हॉटेल याच्या घरी चौकशी केली असता त्याठिकाणी 2 धारदार जंग लागलेल्या जुन्या वापरती लोखंडी तलवार व एक धारदार लोखंडी गुप्ती आढळून आले.


Arm Act offence पोलिसांनी यावेळी एकूण 1 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, आरोपी साहिल सिंग चा पोलीस शोध घेत असून त्याच्यावर कलम 4,25 आर्म ऍक्ट 1949 सह कलम 37(1), 37(3), 131 महाराष्ट्र अधिनियम 1951 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे, पोउपनी संतोष निंभोरकर, पोउपनी सोनाली आगलावे, पोलीस कर्मचारी विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, विष्णू नागरगोजे, इम्रान शेख, निलेश मुडे, भावना रामटेके, इम्रान खान, रुपेश रणदिवे, रुपेश पराते, सचिन राठोड, रुबिना, पूनम सरकार, अश्विनी बेरड, स्नेहा पेटकुले, कामडी मेजर, पल्लवी नरवटे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने