Chandrapur crime branch : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांची मोठी कारवाई

Chandrapur crime branch : चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांची मोठी कारवाई

 Chandrapur crime branch कृष्ण नगर टिळक वार्ड वरोरा येथे राहणारे 41 वर्षीय रमेश पवार यांच्या घरासमोरील हायवा टिप्पर क्रमांक MH34BZ6963 किंमत 57 लाख 3 जून रोजी सायंकाळी 7 वाजता अज्ञात कुणीतरी चोरून नेले.

याबाबत पवार यांनी 4 जून रोजी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली, वरोरा पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

Crime branch


Chandrapur crime branch सदर गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांचे पथक तयार करीत तपास सुरू केला.

सदर ट्रक हा वरोरा, पांढरकवडा मार्गे हैद्राबाद येथे नेला असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

या गुन्ह्यात कौशल्यपूर्ण तपास करीत चोरीला गेलेल्या ट्रक चा पाठलाग करीत चंद्रपूर पोलीस तेलंगणा राज्यात दाखल झाले, मेहबूबनगर जिल्ह्यातील आरोपी 23 वर्षीय उस्मान उर्फ़ चौचू भिभंडा खान रा. मेवात जिल्हा हरियाणा याला ताब्यात घेतले.


त्याच्याकडून चोरी गेलेला हायवा ट्रक ताब्यात घेण्यात आला त्यासोबत वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून चोरी केलेला हायवा टिप्पर क्रमांक MH32AJ3698 किंमत 28 लाख जप्त करण्यात आला.


Chandrapur crime branch आरोपी उस्मान याची चौकशी केली असता त्याने याबाबत माहिती दिली की तो व त्याचे साथीदार हरियाणा, महाराष्ट्र व इतर राज्यात जात जड वाहनांची चोरी करीत त्याला तेलंगणा राज्यात आणून वाहनांचे इंजिन व चेसिस क्रमांक बदलवित त्याला गुजरात राज्यात पाठवीत होते.


आरोपी व त्याच्या टोळीने मिळून महाराष्ट्र व इतर राज्यातून एकूण 7 ते 8 ट्रक चोरी केले असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपिकडून 85 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात पोउपनी विनोद भुरले, किशोर वैरागडे, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, संदीप मुळे व विशाल राजूरकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने