Anandvan ashram warora : आनंदवनात तरुणीची हत्या, कारण आलं समोर

Anandvan ashram warora : आनंदवनात तरुणीची हत्या, कारण आलं समोर

Anandvan ashram warora प्रेम हे प्रेम असत, तुमचं आणि आमचं सेम असत मात्र या प्रेमात आता कसला नेम नसतो, होय आजची पिढी प्रेमाच्या अथांग सागरात वाहून जातात मात्र धोका मिळाल्यावर त्या सागरात मोठी सुनामी सुद्धा येते.

Anandvan crime


असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात उघडकीस आला, प्रेमात धोका मिळल्यावर प्रियकराने प्रेयसीची हत्या केली, ती सुद्धा जगप्रसिद्ध बाबा आमटे यांच्या आनंद वनातील आश्रमात.


Anandvan ashram warora 26 जून ला रात्रीच्या सुमारास आनंद वनातील आश्रमात राहणाऱ्या 24 वर्षीय आरती दिगंबर चंद्रवंशी या तरुणीची चाकूने वार करीत हत्या करण्यात आली, पोलिसांना माहिती मिळाल्यावर अवघ्या 24 तासात आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला.


पोलिसांनी याबाबत माहिती दिली की 


कुष्ठरोग्यांची सेवा ही जनसेवा म्हणून कार्य करणाऱ्या आनंदवनातील आश्रमात मृतक मुलीचे आई-वडील राहत होते, त्यांच्यासोबत 24 वर्षीय आरती ही राहत होती, आई-वडिलांचा उपचार करतेवेळी आरती च्या नजरा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात राहणाऱ्या समाधान माळी सोबत जुळल्या.

समाधान हा स्वतःचा उपचार आनंदवनात करण्यासाठी आला होता, विशेष म्हणजे उपचार घेत तो केअर टेकरचे कामही करायचा.


आनंदवणाच्या या आश्रमात समाधान व आरतीचे प्रेमसंबंध सुरू झाले, 6 महिने दोघेही प्रेमाच्या सागरात बुडाले होते, मात्र त्यानंतर आरती चे लक्ष भरकटले व दुसऱ्या युवकासोबत तिचे प्रेम संबंध जुळले.

याची चाहूल समाधान ला लागली, त्यानंतर दोघात वाद सुरू झाले, समाधान आरती ला म्हणाला की जर तुला माझ्या प्रेमाची गंमत करायची होती तर प्रेमात आणाभाका कशाला घ्यायला लावल्या, यावरून दोघांचे वाद झाले.


Anandvan ashram warora 26 जून ला आरतीचे आई वडील वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे काही कामानिमित्त गेले होते, याबाबत समाधान ला माहिती मिळाली, त्यानंतर त्याने आरती च्या घरी प्रवेश करीत पुन्हा वाद सुरू केला, त्यावेळी समाधान हातात चाकू घेऊन आला होता, त्याने कशाचाही विचार न करता आरतीच्या गळ्यावर, हातावर चाकूने सपासप वार केले, अति रक्तस्त्राव झाल्याने आरती जागेवर कोसळली, यामध्ये तिचा मृत्यू झाला.


रात्री 8 ते 8.30 दरम्यान आरतीचे आई-वडील घरी आले असता बाथरूम जवळ रक्ताच्या थारोळ्यात आरतीचा मृतदेह पडला होता, आरतीची हत्या झाली ही बाब परिसरात वाऱ्यासारखी पसरली, वरोरा पोलिसांना सूचना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेहाचा पंचनामा करीत तपास सुरू केला.


Anandvan ashram warora उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम व पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी याबाबत अधिक माहिती मिळवीत तंत्रज्ञान व ह्युमन इंटेलिजन्स च्या आधारे 24 तासाच्या आत आरोपी समाधान माळी याला अटक केली.

आरोपीवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे.


सदरची यशस्वी कारवाई मुमक्का सुदर्शन, पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती रीना जनबंधू, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, श्रीमती नायोमी साटम, सहायक पोलिस अधीक्षक, उपविभाग वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरोरा येथील पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, स. पो.नी विनोद जांभळे, पो. उप नि धीरज मसराम, पोहेका दिलीप सुर, दीपक दुधे, किशोर बोधे, पोलीस अंमलदार मोहन निषाद, शशांक बदामवार, महेश गवतूरे, रोशन तमशेट्वार यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने