Aghori and Witchcraft Act : जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाची हत्या, नेमकं घडलं तरी काय?

Aghori and Witchcraft Act : जादूटोण्याच्या संशयावरून वृद्धाची हत्या, नेमकं घडलं तरी काय?

 Aghori and Witchcraft Act नागभीड: जादुटोणाच्या संशयावरून एका 67 वर्षीय वृद्धाची हत्या करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मौशी इथे ही घटना घडली. तीन महिन्या पूर्वी याच गावात वडिलाने आपल्या दोन मुली व पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती. त्या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच पुन्हा 20 जूनला रात्री 8 च्या दरम्यान ही घटना घडली. मृतकाचे नाव आसाराम दोनाडकर (67) असे आहे. 

Witchcraft act


जादूटोण्याच्या संशयातून तालुक्यातील मौशी येथील एका वृद्धाच्या झालेल्या हत्येप्रकरणी नागभीड पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ३ आरोपींना अटक केली. आरोपींना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.


          आसाराम सदाशिव दोनाडकर असे मृतकाचे तर संतोष जयघोष मैंद (२६), श्रीकांत जयघोष मैंद (२४) आणि रूपेश देशमुख (३२) अशी आरोपींची नावे आहेत. गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास मृतक आणि त्याचे कुटुंबीय पेरणीविषयी चर्चा करीत असताना आरोपी आसाराम ला म्हणाला की तू जादूखोर आहेस, जादूटोणा करतोस अशी आरडाओरड करीत मृतकाच्या घरावर धावून आले आणि घरातून ओढत हाताबुक्क्यांनी मारहाण करीत घरातून रस्त्यावर आणले. आरोपींकडून मारहाण होत असताना मृतक डोक्याच्या भारावर रस्त्यावर पडला. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली. तरीही आरोपींची शिवीगाळ सुरूच होती.


          मृतक बेशुद्ध पडल्याचे कुटुंबियांच्या लक्षात येताच मृतकास उपचारासाठी ब्रम्हपुरीस हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

        मृतक आसाराम यांचा मुलगा लालाजी याने घटनेची माहिती नागभीड पोलिस ठाण्यास माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि आणि तिन्ही आरोपींना अटक केली.


 नागभीड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३०२,३२३,४५२,५०४,५०६,३४ सहकलम २(१)(ख) महाराष्ट्र नरबळी, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे.


घटनेचा पुढील तपास पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक खोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने