LCB Raid In Ghughus : स्थानिक गुन्हे शाखेची घुग्गुस येथे धाड

LCB Raid In Ghughus : स्थानिक गुन्हे शाखेची घुग्गुस येथे धाड

 पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी सतत जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई सत्र सुरू केले आहे.


Tobacco mafia


Lcb raid in ghughus या सत्रात 5 मे रोजी घुग्गुस येथील ग्रेस शाळेच्या मागील बाजूस अवैध सुगंधित तंबाखू विक्रेता शाहीर हनिफ शेख यांच्या घरी धाड मारली असता त्याठिकाणी पोलिसांना राज्य सरकारने प्रतिबंधित केलेले गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखू असा एकूण 95 हजार 76 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


पुढील तपासकामी आरोपी व मुद्देमाल घुग्गुस पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून पुढील तपास घुग्गुस पोलीस करीत आहे.


सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर आदींनी केली अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेने 6 मे रोजी सकाळी 8.30 वाजता दिली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने