Chandrapur Crime : चंद्रपुरात ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाचे लाजिरवाणे कृत्य

Chandrapur Crime : चंद्रपुरात ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाचे लाजिरवाणे कृत्य

 Chandrapur crime चंद्रपूर शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक 58 वर्षीय हरिकिशन उर्फ पप्पू रामशरण मल्हण यांनी मित्राच्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे.


Crime news


Chandrapur crime 2 मे ला रात्री फिर्यादी व आरोपी पप्पू मल्हान हे दोघे रात्री मद्यप्राशन करीत होते, त्यावेळी मल्हण बाथरूम ला जायचं असल्याचे म्हणत मित्राच्या घरी गेला, त्याठिकाणी बाथरूम ला गेल्यावर मित्राच्या 12 वर्षीय मुलीचा मल्हण याने विनयभंग केला, व सदर बाब पप्पा ला सांगू नको अशी दमदाटी केली.



मल्हान हा घरी गेल्यावर पीडित मुलीने सदर बाब दुसऱ्या दिवशी वडिलांला सांगितली, दुसऱ्या दिवशी मुलीच्या वडीलाने पप्पू मल्हण ला घरी बोलावले त्याला सदर प्रकाराबाबत विचारणा केली, यावरून दोघात वाद झाला असता पीडित मुलीच्या वडीलाने मल्हण ला चांगलेच बदडले.



त्यानंतर मुलीच्या वडीलाने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद नोंदविली, पोलिसांनी आरोपी पप्पू मल्हण यांच्याविरोधात कलम 354, 354(अ) पोक्सो व एट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले, पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केले असता आरोपी मल्हण ची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.


फिर्यादी यांच्यावर कलम 324 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने