Chandrapur city police : बाबूपेठ येथे पोलिसांची धाड

Chandrapur city police : बाबूपेठ येथे पोलिसांची धाड

 Chandrapur City Police 6 मे रोजी दुपारी 12.30 वाजता चंद्रपूर शहर पोलिसांनी बाबूपेठ येथे गोपनीय माहितीच्या आधारे एका घरी धाड मारली असता त्याठिकाणी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला.


Tobacco mafia


Chandrapur city police विविध कंपनीचे प्रतिबंधित तंबाखू किंमत एकूण 33 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करीत 25 वर्षीय अरविंद शामराव निवलकर याला अटक करण्यात आली.



आरोपीवर अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले.



सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे, पोउपनी संतोष निंभोरकर, विलास निकोडे, सचिन बोरकर, इम्रान खान, भावना रामटेके, संतोष पंडित यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने