Taluka Agriculture Officer : कृषी अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Taluka Agriculture Officer : कृषी अधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

गुरू गुरनुले

 Taluka Agriculture Officer मूल -  स्थानिक तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विचित्र वागणुकीमुळे त्रासलेल्या तालुका कृषी कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याच्या  तक्रारीवरुन मूल पोलीस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

Molestation



 प्रशांत गोविंदा कासराळे असे गुन्हा दाखल झालेल्या तालुका कृषी अधिकाऱ्याचे  नांव आहे. स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेल्या काही वर्षापासुन प्रशांत गोविंदा कासराळे हे तालुका कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. याच कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने मूल पोलीस स्टेशन येथे १७ मे रोजी तक्रार दाखल करुन तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी विनयंभग केल्याचा आरोप केला आहे. 



Taluka Agriculture Officer अधिकारी कासराळे यांचे कडून वारंवार घडत असलेल्या घटनांवर आळा बसावा किंवा त्यांची येथुन बदली करण्यात यावी. म्हणुन सदर पिडीत महीला कर्मचाऱ्याने काही दिवसांपुर्वी जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही तक्रार केली परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यानी कासराळे यांचे विरूध्द कोणतीही कारवाई केली नाही. त्यामूळे सदर महिला कर्मचाऱ्याने मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली आहे. 



Taluka Agriculture Officer प्राप्त तक्रारी वरून पोलीसांनी तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार पो.नि. सुमित परतेकी, पोलिस उपनिरीक्षक ठाकरे सदर घटनेचा तपास करीत आहेत. 



सध्या प्रशांत कासराळे अज्ञातवासात असल्याने वृत्त लिहेपर्यंत प्रशांत कासराळे विरूध्द अटकेची कारवाई झालेली नाही. यापुर्वीही सदर कार्यालयात एका वयस्क कर्मचा-याविरूध्द त्याच कार्यालयातील महीला कर्मचाऱ्याच्या तक्रारी वरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. हे विशेष.,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने