Ram nagar police station : दुचाकी चोर घरफोडीच्या गुन्ह्यात अडकले

Ram nagar police station : दुचाकी चोर घरफोडीच्या गुन्ह्यात अडकले

 Ram nagar police station चंद्रपुरातील पागलबाबा नगर येथे राहणाऱ्या 45 वर्षीय खुर्शीदा बानू रहीम शेख ह्या 4 मे रोजी कुटुंबासाहित बाहेर गावी गेल्या होत्या, त्या दरम्यान त्यांच्या घरी अज्ञातानी प्रवेश करीत दुचाकी वाहन व सोन्या चांदीचे दागिने असा 1 लाख 200 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Crime file


7 मे रोजी त्या परत आल्या असता घरातील सामान अस्तव्यस्त स्वरूपात दिसले, कपाटातून सोन्या-चांदीचे दागिने व दुचाकी वाहन गायब होते, त्यांनी याबाबत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली.


Ram nagar police station पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला, गुन्ह्याच्या तपासादरम्यान गुन्हे शोध पथकाला बाबूपेठ परिसरातील जुनोना चौकात एक युवक जुनी वापरती दुचाकी वाहन विकण्यासाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती मिळाली.


गुन्हे शोध पथकाने त्या युवकाला ताब्यात घेतले असता त्याची विचारपूस केली मात्र त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्या युवकाला विश्वासात घेत चौकशी केली असता त्याने पागल बाबा नगर येथे घरफोडी व दुचाकी वाहन अल्पवयीन बालकासोबत मिळून चोरी केली असल्याची कबुली दिली.



Ram nagar police station पोलिसांनी निखिल अनिल मैकलवार याला अटक करीत विधिसंघर्ष बालकाला सुद्धा ताब्यात घेतले, दोघांनी नागपूर, चंद्रपूर व बल्लारपूर येथून दुचाकी चोरी केल्याच्या कबुली दिल्या, पोलिसांनी दोघांकडून 8 दुचाकी वाहन व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 2 लाख 96 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गाडे, पोलीस निरीक्षक यशवंत कदम,सपोनि देवाजी नरोटे, पोउपनी मधुकर सामलवार, दीपेश ठाकरे, पेतरस सिडाम, शरद कुडे, प्रशांत शेंद्रे, हिरालाल गुप्ता, विकास जुमनाके, विकास जाधव, पंकज ठोंबरे, मनीषा मोरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने