Local crime branch : स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या

Local crime branch : स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या दारू तस्करांच्या मुसक्या

गुरू गुरनुले

 Local crime branch मूल - मुल तालुक्यातील चिरोली येथुन दारुबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली कडे महेंद्र पीकअप वाहणाने गैरमार्गाने देशी दारु नेत असतांना चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने चिरोली सुशी मार्गावर ताब्यात घेतली.

Illegal liquor


Local crime branch मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेचे सपोनि हर्षल एकरे, सपोनी मनोज गदादे, पोउनि विनोद भुरले सहकारी पो.हवा. जयंत चुनारकर, किशोर वैरागडे, रजनीकांत पुट्टावार, चेतन गज्जलवार आणि सतिश अवथडे आदिंनी रात्रो 12 वा. दरम्यान चिरोली सुशी मार्गावर नाकेबंदी करून वाहणांची तपासणी करीत असतांना महेंद्र पिकअप क्र. MH-33-T- 2014 मध्ये 100 पेट्या देशी दारु आढळुन आल्या. 



Local crime branch पोलीस पथकाने लागलीच पंचसमक्ष चौकशी करून वाहणासह वाहण चालक मनोज जगदिश मुजुमदार (39) रा. एटापल्ली आणि सहकारी करणसिंग ओमसिंग पटवा (29) रा. मूल यांना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या दारुची किंम्मत 8 लाख 75 हजार असुन वाहणाची किंम्मत 7 लाख असा एकुण 15 लाख 75 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या वाहणातील देशी दारु चिरोली येथील अमोल रामदास ढोरे यांच्या देशी दारु दुकानातील असल्याचे सांगण्यात आले.



 अटकेत असलेले दोन्ही आरोपी सध्या पोलीस स्टेशन मूल येथील बंदीगृहात आहेत. जिल्हा पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अवैद्य दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे सुरु केले असुन पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वाखाली अनेक पथके तयर करण्यात आली आहे. 



Local crime branch मूल स्टेशनच्या हद्दीमधुन लाखोची दारु वाहतुक होत असतांना मूल पोलीसांना माहीती न होता चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेला माहीती होवुन पकडण्यात यावी. याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापुर्वी पंधरा दिवसा आधी चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने तालुक्यातील भवराळा लगत 8 लाखाचा माल हस्तगत केला होता. हे विशेष.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने