Daru Mafia : पाण्याची वाहतूक करणारा निघाला दारू तस्कर

Daru Mafia : पाण्याची वाहतूक करणारा निघाला दारू तस्कर

Daru Mafia 5 मे ला मध्यरात्री स्थानिक गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना अवैध दारू वाहतुकीबाबत गोपनीय माहिती मिळाली माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे व पोलीस स्टाफ ने मोखाळा सावली येथे धडक दिली असता त्याठिकाणी आय 20 कार एमएच 34 बीएफ 3771 ची झडती घेतली असता त्यामध्ये रॉयल स्टॅग,आयकॉनिक व्हाइट कंपनी, हेवर्ड बिअर व देशी दारूचा साठा आढळून आला.


Liquor mafia



Daru Mafia या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आरो चे काम करणाऱ्या 27 वर्षीय विक्की सुरेश गोडसेलवार याला अटक करण्यात आली, त्याची चौकशी केली असता सदर माल हा मूल येथील नरसिंग उर्फ नरसिंग अण्णा गणवेनवार यांचा असल्याचे सांगितले.



Daru Mafia पुढील कारवाई साठी गोडसेलवार याला सावली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले, दारू वाहतूक प्रकरणी पोलिसांनी देशी-विदेशी दारू सहित 9 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.



Daru Mafia सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, जयंता चुनारकर, रजनीकांत पुठ्ठावार, सतीश अवथरे, चेतन गज्जलवार यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने