Chandrapur police station : चंद्रपुरात एक डाव चोराचा

Chandrapur police station : चंद्रपुरात एक डाव चोराचा

 Chandrapur police station एकाच प्रभागात राहणाऱ्याने 55 वर्षीय नागरिकांच्या घरी घरफोडी करीत डाव साधला मात्र चंद्रपूर शहर पोलिसांनी त्या चोराचा डाव हाणून पाडला.

Chandrapur police



19 मे रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये लालपेठ किराणा दुकान व्यवसायिक 55 वर्षीय परशुराम नमीला यांनी घरी चोरी झाल्याची फिर्याद नोंदविली.


19 मे ला दुपारी 3 वाजता परशुराम हे महाकाली मंदिर परिसरात पूजापाठ व जेवणाचा कार्यक्रमाला कुटुंबासहित गेले होते, रात्री 9 वाजता परशुराम घरी आले असता त्यांना घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत दिसले, त्यांच्या घराची खिडकी ही तुटलेल्या अवस्थेत होती, त्यांनी आत जाऊन बघितले असता कपाटातील रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 65 हजारांचा ऐवज अज्ञात चोराने लंपास केला होता.



Chandrapur police station शहर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी तपासाला गती दिली, गोपनीय माहिती गोळा करीत गुन्हे शोध पथकाने लालपेठ कॉलरी क्रमांक 4 येथे राहणारा 32 वर्षीय दीपक रामराज केवट उर्फ भोई याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने सदर घरफोडी केली असल्याची कबुली दिली.


आरोपी कडून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


Chandrapur police station सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहायक पोलिस निरीक्षक मंगेश भोंगाळे, पोउपनी निंभोरकर, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर,संतोष पंडित, भावना रामटेके, इम्रान खान आदींनी केली. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने