Chandrapur Police : चंद्रपूर पोलिसांचे कारवाई सत्र, अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

Chandrapur Police : चंद्रपूर पोलिसांचे कारवाई सत्र, अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले

 चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून अवैध धंदे व्यावसायिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उभारला आहे, वाळू तस्करी असो की जनावरांची अवैध वाहतूक यामध्ये पोलीस आतापर्यंत च्या खऱ्या रक्षकांच्या भूमिकेत पुढे येत आहे.


या कारवाई सत्रात स्थानिक गुन्हे शाखा व वरोरा पोलिसांनी वाळू तस्कर व आयपीएल क्रिकेट सट्टा यावर मोठी धाड मारली आहे.

Chandrapur police


चंद्रपूर जिल्ह्यामधील अवैध धंदे बंद व्हावे यासाठी पोलीस दलातर्फे सफाई मोहीम सुरू आहे, या पार्श्वभूमीवर 13 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने करंजी येथील वर्धा नदीच्या घाटावरून ट्रॅक्टर ने रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या.



करंजी नदी घाट ते करंजी गावाकडे जाणाऱ्या मार्गावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करीत ट्रॅक्टर ट्रॉली वर कारवाई केली.

सदर कारवाई मध्ये 4 ब्रास रेती व वाहन सह एकूण 24 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


तस्करी प्रकरणी अनिल अशोक शेंदरे, प्रवीण उरकुडे, आशिष थेरे, तुषार माथनकर, अमोल पारोधे, सुजित कष्ठी, जाकीर शेख, निलेश मिलमिल यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करीत पुढील तपासकामी वरोरा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.


सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, धनराज करकाडे, गजानन नागरे, स्वामीदास चालेकर, अजय बागेसर, प्रशांत नागोसे, दिनेश अराडे यांनी केली.


दुसरी कारवाई


12 मे च्या रात्री बंगलोर व दिल्ली या चमूत झालेल्या क्रिकेट मॅच वर सट्टा लावत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी साई मंगल कार्यालयाजवळ असलेल्या गुघाणे यांच्या घरी धाड मारली.


या धाडीत ओमप्रकाश जाधव व आशिष जाधव हे दोघे लॅपटॉप व मोबाईल च्या माध्यमातून क्रिकेट मॅच वर सट्टा लावत होते.


पोलिसांनी यावेळी 10 मोबाईल 1 लॅपटॉप, 1 पेन ड्राईव्ह, व दुचाकी वाहन व रोख रक्कम असा एकूण 2 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची चौकशी केली असता यामध्ये अनेक लोक सामील असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तब्बल 30 जणांवर गुन्हे दाखल केले.आरोपींमध्ये नागपूर, वरोरा, वणी व भद्रावती येथील नागरिकांचा समावेश आहे, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांच्या नेतृत्वात सपोनि विनोद जांभुळे, दीपक दुधे, विशाल राजूरकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने