Chandrapur Tobacco Mafia : जटपूरा गेट येथे राहणाऱ्या इटनकर ने चंद्रपुरात आणला सुगंधित तंबाखू पण वाटेतच....

Chandrapur Tobacco Mafia : जटपूरा गेट येथे राहणाऱ्या इटनकर ने चंद्रपुरात आणला सुगंधित तंबाखू पण वाटेतच....

Chandrapur Tobacco Mafia नागपूर मार्गे चंद्रपूर शहरात सुगंधित तंबाखूची खेप येणार अशी गोपनीय माहिती चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला 3 मे ला रात्रीच्या सुमारास मिळाली होती.


Mafia chandrapur


Chandrapur Tobacco Mafia माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ पडोली चौकात नाकाबंदी केली असता काही वेळाने इग्निस कार क्रमांक MH34 BF5220  संशयास्पद रित्या येताना दिसली असता पोलिसांनी वाहनाला थांबवित झडती घेतली असता त्यामध्ये गाडीच्या डिक्कीत तब्बल 6 बोरीमध्ये एकूण 660 ईगल हुक्का शिशा तंबाखू पॅकेट किंमत 42 हजार 240 आढळून आला.




याप्रकरणी पोलिसांनी 19 वर्षीय यश राजू इटनकर राहणार जटपूरा गेट याला अटक केली, स्थानिक गुन्हे शाखेने यावेळी एकूण 5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.


आरोपी यश इटनकर वर अन्न व सुरक्षा मानके कायद्यांतर्गत पोलीस स्टेशन पडोली येथे गुन्हा दाखल केला.



Chandrapur Tobacco Mafia सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, योगेश खरसान, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, नितीन साळवे, प्रकाश बलकी, अजय बागेसर, संतोष यलपुलवार, नितीन रायपुरे व प्रमोद डंभारे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने